रविंद्र भेगडे यांनी आदिवासी बांधवां सोबत ठेका धरत केला राष्ट्रपती निवडीचा आनंदोत्सव
वडगाव मावळ:
राष्ट्रपती निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व सहयोगी पक्षाच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची प्रचंड बहुमताने राष्ट्रपती पदी निवड झाल्याने त्यांच्या रूपाने देशाला प्रथमच आदिवासी महिला राष्ट्रपती लाभल्याने सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील राऊतवाडी येथील आदिवासी पाड्यावर भारतीय जनता पार्टी मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे आणि प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर यांनी पवन मावळातील सहकाऱ्यांसह आदिवासी बांधवांसोबत ठेका धरत लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला..!
त्याचप्रमाणे आज महाराष्ट्राचे अभ्यासू उपुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना मिठाई वाटप करून देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो अशी या निमित्ताने सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी माजी उपसभापती शांताराम कदम,यदुनाथ चोरघे,विठ्ठल दादा घारे,गणेश धानिवले,शंकर लोखंडे,जयवंत लोखंडे,राकेश लोखंडे,सुभाष दाहिभाते,काळूराम बरदाडे,तानाजी शेंडगे,दिलीप राऊत,नारायण बोडके,माऊली अडकर,गणेश ठाकर,संतोष जाधव,गणेश कल्हाटकर,अर्जुन शेडगे,संदीप पवार,प्रशांत लगड,निवृत्ती साठे,संदीप दळवी,विकास दळवी,रवि राऊत,पप्पू दाभाडे यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!