विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसनिमित्त ओ बी. सी.सेल महिलांच्या वतीने शेती भात लागवडी मध्ये सहभाग
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यात भात लावणी जास्त प्रमाणात केली जाते. भात पीक हेच उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणून  पाहिले जाते.श्रमप्रतिष्ठा जपत मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल महिला सेलच्या वतीने कान्हे गावातील शेतकरी दशरथ शिंदे यांच्या शेतीत भात लागवड करीत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा वाढदिवस साजरा केला.
यंदाचा पाऊस उशीर झाला तरी शेतीच्या लागवड करीता पाऊस चांगला पडत आहे.आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गर्शनाखालील आणि मावळ तालुक्यातील ओ. बी. सी.सेल महिला अध्यक्षा संध्या थोरात यांच्या संकल्पनेतून आगळा वेगळ्या उपक्रमतून शेती भात लागवड करण्यात आली आहे.
यावेळी  मावळ तालुका ओ.बी.सी.सेल महिला सहसंघटक वैशाली लगाडे,नाणे मावळ अध्यक्षा मावळ तालुका उपाध्यक्ष वैशाली आहेर, सपना फाटक,तळेगाव स्टेशन कार्याध्यक्षा लक्ष्मी गजाकोश,तळेगाव शहर कार्याध्यक्षा लीना दिघे,तळेगाव स्टेशन उपाध्यक्षा रेखा बरीदे,देवघर गाव अध्यक्षाअनिता देशमुख,तळेगाव सरचिटणीस जयश्री म्हसे,आणि कान्हे गावातील ओ.बी.सी.सेल अध्यक्ष सोनल आनंदे यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!