वडगाव मावळ:
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अतुल खंडुजी वायकर यांच्या वतीने वडगाव नगरपंचायत मधील सर्व आरोग्य कर्मचारी यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे,राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, राजेंद्र कुडे, राजेंद्र बाफना, प्रविण ढोरे, विशाल वहिले,सुरेश जांभुळकर,रमेश भुरूक, अतुल राऊत, मंगेश खैरे, युवराज ढोरे, वि. म शिंदे गुरूजी, सुनिल ढोरे, सुरेश जांभुळकर, गणेश म्हाळसकर, प्रविण ढोरे, नितीन चव्हाण, विकी भोसले, सिद्धेश ढोरे, शरद ढोरे, महेंद्र ढोरे, गणेश ढोरे, सुहास वायकर, यशवंत शिंदे, सौरभ सावले, केदार बवरे, राहिल तांबोळी यांच्यासह वडगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती युवक अध्यक्ष अतुल वायकर यांनी दिली.

error: Content is protected !!