जगाच्या बाजारपेठेत टिकायला संगणक हा महत्त्वाचा: उदय ठाकूर
पवनानगर:
ग्रामीण भागातील मुलांना  जर जगाच्या बाजारपेठेत टिकायचे असेल तर संगणक ज्ञान महत्त्वाचे आहे.ते ज्ञान संगणक माध्यमातून विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे मत वोलांटे  टेक्नाॕलाजीचे इंडीया हेड उदय ठाकूर यांनी पवनानगर येथे व्यक्त केले.
वोलांटे टेक्नॉलॉजीज् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने  पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना २५ संगणक भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
  यावेळी वोलांटे टेक्नाॕलाजी इंडीया प्रायव्हेट लिमिटेडचे  उदय ठाकूर, इंडिया हेड गिरीषा मिरजे,युनायटेड किंगडम येथील  जॉन फेरल, बुद्धदेव दासगुप्ता, विक्रांत संत,प्राचार्या अंजली दौंडे,पर्यवेक्षिका निला केसकर ,शिक्षक प्रतिनिधी गणेश ठोंबरे,,सुनिल बोरुडे,महादेव ढाकणे,सुनिता कळमकर,सुवर्णा काळडोके,भारत काळे,अमोल जाधव,प्रदिप ढोंगे,एश्वर्या बुटाला,ज्योती कोंढभर,चैत्राली ठाकर  यांंच्यासह शिक्षकवृंद तसेच शिक्षेके-तर कर्मचारी उपस्थीत होते.
    ग्रामीण भागातील विद्यार्थांंना तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ह्या कंपनीने  २५ संगणक भेट देण्यात आले.
संकुलातील अध्यापिका वैशाली व-हाडे व  सुजाता कोळेकर    यांंच्या प्रयत्नांनमुळे हे संगणक संकुलासाठी मिळाले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनिल बोरुडे यांनी तर पाहुण्यांची ओळख महादेव ढाकणे,सुनिता कळमकर यांनी तर सुत्रसंचालन सुवर्णा काळडोके यांनी केले.आभार प्राचार्या अंजली दोंडे यांनी मानले.

error: Content is protected !!