वडगाव मावळ:
स्वातंत्र्याच्या अमॄतमहोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ विद्यालय’स्पर्थेत मावळ तालुक्यातील जि.प.शाळा कुसगावला ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार प्राप्त झाला.पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचे हस्ते शाळेतील शिक्षक नितीन भोंगळे यांनी हा पुरस्कार स्विकारला. मावळमधील एकमेव जिल्हा परिषद शाळेला हा पुरस्कार मिळाला.
     शाळा व गावाचा अभिमान वाढवणारा हा पुरस्कार असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन सदस्य,विद्यार्थी व शिक्षक यांनी शाळेत साजरा केला.प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अश्विनी ज्ञानेश्वर गुंड, उपरपंच श्री सुरज केदारी यांनी मुख्याध्यापिका मानकर मँडम व शिक्षकांचा सत्कार केला.
        या कार्यक्रमात उपसरपंच श्री सुरज केदारी, ज्ञानेश्वरभाऊ गुंड व शाळा व्यवस्थापन सदस्य श्री किसन गुंड यांनी शुभेच्छा दिल्या.प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या फरिन मजिद शेख,श्री जालिंदर झगडे,श्री मदन गाडे श्री ऋषिकेश ठुले हे पदाधिकारी उपस्थित होते.शिक्षक श्री महादेव शेलार यांनी शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली तर शाळेच्या शिक्षिका सौ दैवशाला एकाळे व श्री नितीन भोंगळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

error: Content is protected !!