
ओबीसी आरक्षण टिकल्या बद्दल वडगावला भारतीय जनता पार्टी कडून आनंदोत्सव
वडगाव मावळ:
भारतीय जनता पार्टी वडगांव शहराच्या वतीने आज ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकल्या बद्दल आनंदोउत्सव साजरा करण्यात आला, यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून सरकार व सुप्रीम कोर्टाचे आभार माण्यात आले.
बांठीया आयोगाच्या सहाय्याने राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या देवनाथ सरकारने ओबीसी आरक्षण पुन्हा लागु करण्यात यश मिळविले. याचा आनंद वडगांव शहर भाजपाने पंचायत समिती चौकात फटाके वाजवून व पेढे वाटुन साजरा केला. गेल्या अनेक महिन्यातील प्रलंबित असलेला व ओबीसी समाजाच्या जिव्हाळ्याचा असलेला आरक्षणाचा प्रश्न सोडविल्याबद्दल मावळ पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रेवती वाघवले यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या शब्दांत भाजपा शहराध्यक्ष अनंताजी कुडे यांनी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर वाघवले, मा सभापती गुलाबराव म्हाळसकर,मावळ भाजपा चे कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे,संघटन मंत्री किरण भिलारे,वरिष्ठ उपाध्यक्ष प्रसाद पिंगळे,नगरसेवक प्रविण चव्हाण, किरण म्हाळसकर, ॲड. विजय जाधव, मा सरपंच नितीन कुडे, संभाजी म्हाळसकर,युवा अध्यक्ष विनायक भेगडे,अनुसूचित जाती अध्यक्ष दीपक भालेराव,सरचिटणीस मकरंद बवरे , शंकर भोंडवे शरद मोरे, , संपत म्हाळसकर, , अमोल खोल्लम, हरिश दानवे, ओबींसी अध्यक्ष समीर गुरव,कामगार आघाडी अध्यक्ष गणेश वाघवले,अतुल म्हाळसकर, महेंद्र म्हाळसकर, अमोल ठोंबरे, गणेश भिलारे व , सागर भिलारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
- रवि ठाकर एक जिवलग मित्र
- हर घर तिरंगा अभियान गावोगावी राबवणार : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे
- हिंदू उत्सव समिती व कामशेत ग्रामस्थांकडून स्वराच्या कुटुंबियास मदत
- सरकार कोणाचेही असो,आमच्या सुरक्षिततेबाबत ही उदासिनता का?
- कोथुर्णे घटनेतील नराधमाला फाशी द्या; या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे आमरण उपोषण


