मुंबई :
शिवसेनेचे उपनेते शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.त्यांच्या सोबत पुढील फुटणारे खासदार म्हणुन अन्य  नाव पुढे येते आहे.तेही मावळचे खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटात सामील झाल्या मुळे डबेवाले कामगारांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. परंतु मावळ,मुळशी,खेड आंबेगाव,जुन्नर तालुक्यांतील डबेवाले आणि डबेवाल्यांचे कुटुंबीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत प्रामाणिक राहील अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष गंगाराम तळेकर यांनी दिली. 
मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेले आढळराव पाटील यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.  खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. त्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आहेत. त्यामुळे या भागातील डबेवाले कामगार दुसऱ्यांचे नेतृत्व मान्य करणार नाही. “ मुंबई डबेवाला असोशिएशन” उध्दव ठाकरे यांचे सोबत आहे. मुंबईचे डबेवाले शिवसेने सोबत काल ही होते आज ही सोबत आहे आणी उद्या ही सोबत राहतील अशी ग्वाही तळेकर यांनी दिली.
कारण गेल्या पाच वर्षात शिवसेनेने डबेवाल्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रमाणीक पणे प्रयत्न केले आहेत. डबेवाल्यांना लोकल रेल्वे स्टेशन बाहेर मोफत सायकल स्टॅन्ड उपलब्द करून दिले आहेत. चर्नीरोड,ग्रॅटरोड,अंधेरी येथील सायकल स्टॅन्ड पुर्ण होऊन डबेवाले ते स्टॅन्ड वापरत आहेत व अनेक रेल्वे स्टेशन बाहेर सायकल स्टॅन्डचे काम प्रगती प्रथावर आहे. जसं जशी जागा उपलब्द होईल त्यांवर ते अवलंबून आहे. उध्दव ठाकरे यांचे वाढदिवसा निमित्त शिवसेनेच्या वतीने डबेवाल्यांना मोफत सायकली वाटण्यात आल्या आहेत त्या मुळे डबेवाल्यांना काम करण्यासाठी सायकल मोफत उपलब्द झाल्या.
डबेवाल्यांच्या घराचा प्रश्ना बाबत आघाडी सरकारच्या वतीने महत्वाच्या बैठका मंत्रालयात पार पडल्या जवळ जवळ डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न हा अंतीम टप्या पर्यंत पोहचला आहे लवकरच तो प्रश्न मार्गी लागेल. डबेवाल्यांना मुंबई महानगर पालिकेतच्या वतिने वांद्रे या ठिकाणी डबेवाला भवनसाठी जागा देण्यात आले.
डबेवाल्यांच्या आरोग्य बाबत मुंबई महानगर पालिका सभागृहांने ठराव पारीत केला आहे की डबेवाल्यांच्या उपचारासाठी मुंबई महानगर पालिका रूग्णालयात विषेश कक्ष असावा लकरच या ठरावाची अंमल बजावणी होईल अशी आशा आहे. गेल्या पाच वर्षात आश्वासनांची पुर्तता करण्याचा प्रामणीक प्रयत्न शिवसेने कडून झाला आहे. तसेच
मुंबईत मराठी अस्मिता जपण्याचे काम शिवसेनेने केले आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी शिवसेनेची नाळ जोडली गेली आहे. आम्ही ही मराठी आहोत म्हणुन “ मुंबई डबेवाला असोशिएशन” या अडचणीच्या काळात मा.उध्दव ठाकरे यांचे सोबत आम्ही आहोत असा विश्वास सुभाष तळेकर
अध्यक्ष मुंबई डबेवाला असोशिएशन यांनी दिला.

error: Content is protected !!