वडगाव मावळ:
नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या वतीने वडगाव शहरातील सर्व ठाकरवस्ती, घरकुल वसाहत, झोपडपट्टीतील १५० गरजू कुटुंबीयांना छत्र्या व बॅल्केट चे वापट करण्यात आले.
आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे बंधू युवा उद्योजक सुधाकरजी शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे यांच्या वतीने वडगाव शहरातील टेल्को काॅलनी परिसरातील ठाकरवस्ती, शिंदे टेकडी परिसरातील ठाकरवस्ती, वडगाव उर्से खिंड हद्दीतील ठाकरवस्ती, घरकुल वसाहत, माळीनगर हायवे परिसरातील झोपडपट्टी येथील गरजू कुटुंबीयांना मोफत छत्री आणि बॅल्केंटचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, व्याख्याते विवेक गुरव, सुरेश जांभुळकर, राजेंद्र बाफना, सुनिल शिंदे, संतोष खैरे, अतुल राऊत, मंगेश खैरे, भाऊसाहेब ढोरे, सचिन कडू, नितीन चव्हाण, शरद ढोरे, मयुर गुरव, शैलैश वहिले, सिद्धेश ढोरे, संदिप ढोरे, हर्षद ढोरे, केदार बवरे, राहिल तांबोळी आणि वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
पावसाळ्याचे दिवस असल्याने सामाजिक बांधिलकी जपत या गरजू कुटुंबांना १५० छत्र्या तसेच १५० बॅल्केट्स चे वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!