तळेगाव दाभाडे :
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे  हा अपघात घडला.
या अपघातात अपर्णा उमेश दिवेकर (वय ५३) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून कौस्तुभ उमेश दिवेकर (वय २९, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार वैभव नलगे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून असताना कौस्तुभ याने निष्काळजीपणे वाहन चालविले. त्यामुळे तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ कॅम्प जवळ दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात त्याची आई अपर्णा यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकीस्वार कौस्तुभ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कौस्तुभ देखील जखमी झाला आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!