वन महोत्सव २०२२ अंतर्गत चिंबळी येथे वृक्षलागवड
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर,डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी आणि जुन्नर वनविभाग चाकण परिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने
चिंबळी येथे वृक्षारोपण करण्यात आले. शहराजवळील लोकांना लोप पावत चाललेल्या वन औषधांचे महत्व कळावे व वनऔषधाची उपलब्धता व्हावी. शहराजवळील प्रदुषण कमी व्हावे तसेच उजाड पडलेले डोंगर हिरवेगार करणे, जमीनीची धूप कमी करणे, जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण वाढविणे. अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक / अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड आणि मा.अमोल सातपुते, उपवनसंरक्षक जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. योगश एस. महाजन. वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण यांचे नियोजनातुन श्री.सचिन.यु.जाधवर, वनपाल आळंदी, कु. रेश्मा एम. गायकवाड वनरक्षक चऱ्होली खु. आचल गवळी वनरक्षक कोयाळी,डॉ सुभाष चाटे सर यांचे देखरेखेखाली मौजे चिंबळी येथील वनक्षेत्रात त्रिफळा (आवळा, हिरडा, बेहडा) औषधी रोपवन अंतर्गत २ हेक्टर क्षेत्रावर  ५०० झाडांचे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला.
यामध्ये एकूण ५०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.संस्थेचे जेष्ठ सभासद श्री प्रभाकर मेरुकर सर आणि श्री वसंत दळवी सर यांचे हस्ते वृक्ष लागवड कार्यक्रमाचे  उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी वृक्ष लागवड पूर्ण झाल्यावर रोप वनाचे संरक्षण संगोपन व देखभालीसाठी ग्रामपंचायत चिंबळी सहकार्य करणार असल्याचे व झाडांचे अच्छादन वाढण्यासाठी लोकांनी शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड करावी असे आवाहन डॉ मोहन गायकवाड यांनी व्यक्त केले.
  वृक्ष लागवड कार्यक्रमात डॉ मोहन गायकवाड व फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोहन चितलांगे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र फडतरे,उपाध्यक्ष शब्बीर मुजावर,खजिनदार मनोहर कड,संचालिका प्रिया पुजारी बहुसंख्येने उपस्थित होते.एकूण ५३ सभासदांनी सहभाग घेतला होता.

error: Content is protected !!