वडगाव मावळ:
दुचाकीला टेम्पोंने दिलेल्या धडकेत विवाहित महिलेचा मृत्यू झाला. वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. मंगरूळ ता.मावळ येथील सुनिता कुंडलिक शेटे (वय ४५) असे या अपघातात निधन झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे. शेटे पती पत्नी वडगाव मावळ वरून पुढे जात असताना पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. पती कुंडलिक हे जखमी झाले असून त्यांच्यावर तळेगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास वडगाव मावळचे पोलीस करीत आहे.

error: Content is protected !!