टाकवे बुद्रुक:
क्रिसिल फौंडेशन अंतर्गत मनीवाईज् सेंटर मावळ, जांभूळ यांनी गावातील महिलांना बँक आणि पोस्ट यामध्ये असणारे सेवा, विमा, तसेच सरकारी वेगवेगळ्या प्रकारचे सेवा,सुविधा याबाबत माहिती दिली.तसेच यामध्ये फक्त माहितीच नाही तर प्रत्यक्ष खेळाच्या माध्यमातून देखील त्यांनी आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे बदल केला पाहिजे ,नको तिथे खर्च करू नये तसेच आपण बचत करणे गरजेचे आहे अशा अनेक बाबी समजून सांगण्यात आल्या.
माया मॅडम आशा ताई,गावातील युवक वर्ग गावातील महिला उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून क्रिसिल फौंडेशन चे रिजिनल् मॅनेजर मा.श्री.देविदास शिंदे हजर होते. शिंदे यांनी  देखील वित्तीय साक्षरता यावर मार्गदर्शन केले. आणि केंद्राचे डाटा ऐंटरी ओपरेटर  शीतल भालेराव , सेंटर मनेजर विक्रम इंगवले यांनी मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!