मावळातील किल्ले, लेण्या, धबधबे व पर्यटन स्थळांवर फिरण्यास बंदी
वडगाव मावळ:
हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी इशारा दिला आहे. सध्या ज्या पद्धतीने पाऊस पडत आहे. त्यांचा विचार करता पर्यटकांच्या व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मावळ तालुक्यातील सर्व गड किल्ले, लेण्या धबधबे व पर्यटनस्थळांवर फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
यामुळे मावळातील कुठल्याही पर्यटन स्थळांवर पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे. बुधवारी (दि. १३) मध्यरात्री पासून रविवारी (दि.१७) च्या मध्यरात्री पर्यत हा बंदीचा आदेश लागू असेल असे जिल्हाधिकारी पुणे डॉ. राजेश देशमुख यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

error: Content is protected !!