मावळातील  धरणांचा पाणी साठा वाढला: वाडिवळेतून विसर्ग सुरू
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळातील  धरणांचा पाणी साठा वाढला असून वाडिवळेतून विसर्ग सुरू झाला आहे. नदीपात्राचा प्रवाह वाढल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तीन धरणे शंभरीच्या उंबरट्यावर पोहचली आहे.
मावळ व पिंपरी चिंचवड ला पाणीपुरवठा करणारे पवना धरणा 42.19 टक्के भरले आहे. तालुक्यातील आंद्रा धरणात 91.78 टक्के पाणीसाठा झाला आह.या धरणातून तळेगाव औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो.
कासारसाई धरणात 74.53 टक्के,वडिवळे धरणात 70.32 टक्के पाणीसाठा झाला आहे. टाटा कंपनीचे वलवण धरण 41 टक्के, शिरोता  धरण 24 टक्के, ठोकळवाडी धरण 36 टक्के तर लोणावळा धरण 68 टक्के भरले आहे.
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लोणावळ्यातील लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. यामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पुर येऊ शकतो. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीपात्राला पुर येऊन वाकसई, कार्ला, मळवली, कामशेत, नाणे मावळ भागात पुर आला आहे. सांगिसे व इतर आठ गावांना जोडणारा पुल पाण्याखाली गेला आहे. नाणे मावळाला जोडणाऱ्या पुलाला देखील पाणी लागले आहे.
वाडिवळे धरणातून विसर्ग सुरू झाल्याने कामशेत,नाणे,पारवडी,कान्हे,राजपुरी, सांगवी, वारंगवाडी,आंबी,नाणोली तर्फे चाकण, वराळे, इंदोरी सह अन्य नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!