कांब्रे (आंदर मावळ):
आंदर मावळातील  कांब्रे येथील धबधबा अती प्रवाहाने वाहत असून रुद्र रूप धारण केले आहे. परिणामी  रस्त्यावरून  वाहणाऱ्या पाण्याचा वेग खूप अधिक प्रमाणात आहे त्यामुळे येथून पुढे खांडीकडे मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांचा व  टाकवे बुद्रुक कडून खांडीकडे जाणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटला आहे तरी धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह कमी होई पर्यंत व रस्त्यावरील  पाण्याचा  प्रवाह पूर्णपणे  ओसरेपर्यंत रस्त्यावरून कोणत्याही नागरिकांनी जीवघेणा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंदर मावळ मध्ये काही भागात अशी परिस्थिती उद्भवली असल्यास त्या ठिकाणावरून रस्त्यावरून गाडी घालण्याचे धाडस किंवा जीवघेणा प्रवास कोणत्याही नागरिकांनी करू नये असे आव्हान पोलीस प्रशासन,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आलेले आहे.

error: Content is protected !!