वडगाव मावळ:
मावळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ओढे नाले ओसंडून वाहत आहे.इंद्रायणी, अंद्रायणी, पवना, कुंडलिका नद्या दुथडी भरून वाहत आहे. पवना, वाडिवळे, ठोकळवाडी,जाधववाडी,शिरोता,वलवण धरणाच्या पाणीसाठयात वाढ होत असून भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ग्रामीण भागाला जोडणारे पूल पाण्याखाली गेले असून नागरिकांची गैरसोय झाली आहे. काही ठिकाणच्या साकव पूलाची पडझड झाली आहे.तुंग मोरवे परिसरातील पाच गावांची कोंडी झाली आहे.
आंदर मावळातील पारीठेवाडी अनसुटे गावा दरम्यानच्या पूलावरून पाणी वाहू लागले आहे. तर हा साकव पूल तुटला आहे.
वाडिवळे पूल पाण्याखाली गेल्याने सांगिसे खांडशी परिसरातील गावक-यांचा चार दिवसांपासून संपर्क तुटला होता.वीज पुरवठा खंडीत होत आहे.पवन मावळातील शिवली परिसरातील विद्यार्थ्यानी साखळी करून शाळेतून घरी जाणे पसंत केले. पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे वर्षाविहाराला येणा-या पर्यटकांची संख्या वाढत आहे. अरुंद रस्ते निसरडे झाल्याने वाहने चालवताना खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासन करीत आहे.नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!