पवनानगर:
घुसळखांब व मोरवे – तुंग हे दोन्ही बाजुचे रस्ते तुटल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे अनेक ओढ्यांना पूर आला आहे अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी गेल्याने वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत.या जोरदार पावसामुळे लोणावळ्याकडुन तुंग गावाकडे येणारा रस्ता पाण्याचा प्रवाहामुळे तुटून गेल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
त्याचप्रमाणे जवण मार्गे तुंगकडे जाणारा रस्त्यावरील मोरवे येथील पुल  पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद झाला आहे.त्यामुळे पश्चिम पवनमावळातील चार ते पाच गावाचा लोणावळा व पवनानगर या मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे.
मोरवे येथील पुलाचे काम जीर्ण झाले होते तसेच खुसळखांब येतील रस्ता पाण्याचा प्रवाहाने अरुंद झाला होता त्यामुळे या पावसाळ्यात तो वाहून जाऊ शकतो हे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणुन दिले होते परंतु प्रशासनाने त्याकडे दूर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
याबाबत तुंग गावचे सरपंच वसंत म्हसकर यांना विचारले असता ते म्हणाले की, मागील पावसाळ्यात हा रस्ता थोडा वाहून गेला होता याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा विचारणा करण्यात आली परंतु अधिकाऱ्यांनी त्याकडे दूर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

error: Content is protected !!