कान्हे
कान्हे फाटा येथील ऍक्सीस बँकेचे एटीएम मशीन फोडून २१  लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना रविवारी (दि. १० )ला  मध्यरात्री साडेबारा ते दीडच्या  दरम्यान घडली.
याप्रकरणी संदिप हिरासिंग जाधव (वय ३५रा.पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कान्हे फाटा येथील एक्सीस बँकेच्या एटीएम मशीनचे शटर उचकटून मशीनची तोडफोड करून मशीनमधील २१  लाख २२ हजार ९०० रुपयांची चोरी झाली आहे.
याप्रकरणी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून पुढील तपास करीत आहेत.

error: Content is protected !!