आंबी :
आंबी ग्रुप  ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माधुरी जाधव व  उपसरपंचपदी प्रदीप दत्तू बनसोडे यांची बिनविरोध निवड  झाली.
मावळत्या सरपंच संगीता घोजगे व उपसरपंच सागर शिंदे यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी बजरंग मेकाले, तलाठी कविता मोहमारे यांनी काम पाहिले.
ग्रामसेवक बालाजी सुरवसे, माजी सभापती गुलाब म्हाळस्कर, माजी उपसभापती गणेश जाधव, मा. सरपंच वामन वारिंगे, टाकवे गावचे सरपंच भूषण असवले, मा. सरपंच भरत घोजगे, मा. सरपंच बाबासो घोजगे, पोलीस पाटील भानुदास दरेकर, मा. सरपंच अलका जाधव, मा. सरपंच बायडा गराडे, मा. उपसरपंच एकनाथ शेटे, मा. उपसरपंच रविन्द्र घोजगे, चंद्रकांत घोजगे, मा. सरपंच सुनील नाणेकर, नाणेकर वाडीचे सरपंच संदेश साळवे, मा. सरपंच संदिप जाधव, नाणेकर वाडीचे उपसरपंच रावसाहेब नाणेकर, मा. सरपंच सिद्धार्थ नाणेकर, मा. सरपंच राहुल नाणेकर, मा. सरपंच गोपाल जाधव, मा. सरपंच रूपेश जाधव, मा. सरपंच संदीप नाणेकर, मा. उपसरपंच माऊली गोळे, मा. सरपंच संजय जाधव, मा. सरपंच वासुदेव नाणेकर, लायन्स क्लब अध्यक्ष रूपेश नाणेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रियंका नारायण शिंदे, तुषार मापारी,तेजस मापारी,  बायडाबाई बाबासो घोजगे, सारिका रामनाथ धुमाळ, ग्रामस्थ, महिला, युवक, नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते.
सरपंच माधुरी जाधव म्हणाल्या,” गाव पातळीवरील विकास कामांना प्राधान्य देऊ. बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केलेल्या सर्वाचे आभार.

error: Content is protected !!