
स्काऊट गाईड उजळणी व नोंदणी कार्यशाळा संपन्न
तळेगाव :
पुणे भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्था आयोजित एकदिवशीय उजळणी व पथक नोंदणी कार्यशाळा जि. प. प्राथमिक शाळा कान्हे येथे बुधवार ६ जुलै रोजी संपन्न झाली. मावळ पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मा. बाळासाहेब राक्षे यांचे अधिपत्य व मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
पंचायत समिती तालुकास्तरीय या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सत्तर शिक्षकांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेत स्काऊट गाईड अभ्यासक्रम, मूल्यमापन, प्रशिक्षणे, शिबीरे, मेळावे व वर्षभरातील उपक्रम याबाबत उजळणी व नियोजन करण्यात आले.
पुणे जिल्हा गाईड आयुक्त शमा शिकलगार, सहाय्यक आयुक्त विजय जोरी व अनिल कळसकर, संघटन आयुक्त उषा हिवराळे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आवर्जुन उपस्थित विस्तार अधिकारी मा. श्री. कृष्णा भांगरे यांनी कार्यशाळेचे उद्घाटन करीत सर्वांना शुभेच्छा दिल्या, विषय तज्ञ मा. बिल्किसबानो अन्सारी यांनी कार्यशाळेबाबतची भूमिका प्रास्ताविकातून मांडली. मुख्याध्यापिका मा. शोभा वहिले यांनी शाळेतर्फे तुळशीची रोपे भेट देऊन अतिथी व मार्गदर्शकांचे स्वागत केले व धन्यवाद दिले. केंद्रप्रमुख श्री. सुहास धस व श्री. राहुल गुळदे तसेच स्काऊट जिल्हा कार्यालय लिपिक पूनम भोरे हेही याप्रसंगी उपस्थित होते.
- कोथुर्णेच्या पिडीतीला न्याय कधी?आमदार सुनिल शेळके विधी मंडळात कडाडले
- कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार असल्यामुळे नागरिकांची प्रवासा दरम्यान होणार तारांबळ
- आढले बुद्रुक येथे ३६ फूट ध्वज स्तंभाचे अनावरण
- विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने शिरगावात शेतकऱ्याचा मृत्यू
- पर्वती माणकु काळे यांचे निधन


