
कान्हे:
कान्हे रेल्वे फाटक दुरूस्ती कामामुळे गुरुवार ता.७ला सकाळी १०वा. ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या सुचना नुसार
दि. 07/07/2022 सकाळी 10 ते सायंकाळी 04 पर्यंत गेट नं. ४५ (कान्हे) रेल्वे दुरुस्तीच्या कामामुळे बंद राहील. पर्यायी व्यवस्था गेट नं. ४३ नाणे गेट (कामशेत) येथून केली आहे याची नोंद घ्यावी.
पर्यायी फोर व्हीलर गाडी साठी मार्ग
1) कामशेट नाणे गेट साई कचरेवाडी टाकवे बुद्रुक
2) वडगाव, आंबी midc, मंगरूळ, आंबळे निगडे, कल्हाट, फळणे मार्ग टाकवे बुद्रुक अथवा आंदर मावळचा पश्चिम भाग. असे जाता येईल.
जांभूळ येथील भुयारी मार्ग चे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी सदरील रस्ता बंद आहे.
कान्हे येथील गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 04 वाजेपर्यंत गेट बंद राहणार असल्यामुळे औद्योगिक वसाहत टाकवे बुद्रुक सह आंदर मावळ मधील नागरिकांनी दखल घ्यावी व पर्यायी रस्त्याचा उपयोग करावा.
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप
- खांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा
- पैसाफंड शाळेत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन


