
टाकवे बुद्रुक येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
टाकवे बुद्रुक:
येथील संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ, व शिक्षक, ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक पदाधिकारी, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन यांच्या उपस्थितीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
वाणिज्य इयत्ता १२वी प्रथम क्रमांक रचना बाळू शिंदे, द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वरी ऋषीनाथ शिंदे,तृतीय क्रमांक उज्वला प्रल्हाद डोळस.
कला शाखा इयत्ता १२वी प्रथम तीन क्रमांक अनुक्रमे
क्षितीज सुनील शिरसट, प्रफुल अशोक गोतरणे, धीरज नथू लंके.
इयत्ता दहावीत निकिता नामदेव चोरघे,तन्वी अनिल ठोसर, शुभम सोमनाथ लंके या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष तुकाराम महादू असवले, उपाध्यक्ष बडोबा मालपोटे, संचालक दत्ताभाऊ असवले, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ असवले, विविध कार्यकरी सोसायटी चेअरमन पांडुरंग मोढवे, विद्यालयाचे प्राचार्य उभे सर, आल्हाट सर, प्रस्तावना नारायण असवले सर यांनी केली, सूत्रसंचालन वारिंगे सर यांनी केले आभार एम के जाधव सर मानले.
ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ असवले म्हणाले,”
दहावी हा मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. यानंतर विद्यार्थ्यांना करिअरबाबत एक दिशा निवडणे अपरिहार्य असते. त्यासाठी मुलांसह पालकांनीही विचार करावा. प्रथम मुलाची आवड लक्षात घ्यावी. आपली आवड आणि त्याचे जीवनातील महत्त्व समजून घ्यावे. आपल्या क्षमता ओळखाव्यात.
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप
- खांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा
- पैसाफंड शाळेत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन


