पावसाळ्याच्या सुरवातीला खेकड्यांचा हंगाम सुरु
खेकडे ठरताहेत त्यांचा जगण्याला आधार
टाकवे बुद्रुक:
ओढया- नाल्यात, नदीवर खेकडे पकडण्याचा साई येथील कातकरी वस्तीवरील कैलास हिलम, विष्णू वाघमारे, नवनाथ हिलम व इतर कातकरी बांधवांचा रोज रात्रीचा क्रम. कामशेत येथून कोंबड्यांचे कारकस खरेदी करायचे. सायंकाळी 6:30 ला दोरीला बांधून ओढ्या- नाल्यात, नदीत  टाकायचे आणी पुन्हा जाऊन चिकन खात असलेली खेकडे पकडायची.
श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी व श्रावण संपल्यावर खेकडांना खूप मागणी असते. खेकडे खाल्ल्याने कमरेचे होणारे त्रास कमी होतात असे जुनीजाणती लोकं सांगतात. पावसाळ्यात ग्रामीण भागातील अनेक लोक हिराळ पेटवून सायंकाळची शेतात, नाल्यात खेकडे पकडण्यासाठी जातात. मग ग्रामीण भागात ओढ्यावर, शेतात अनेक हिराळ पेटवलेले दिसू लागतात. मोठ्या पकडण्यासाठी भीती वाटत असली तरी खेकड्याच्या मागची बाजू पकडायची आणी पोत्यात टाकायचं मात्र त्यासाठीही हिम्मत लागतेच. भरपूर खेकडे पकडल्यावर ते नातेवाईकांत वाटतात. आणी खेकडे खाण्याचा आनंद घेतात. आता मात्र खेकडे शेतात आढळत नाही. ते ओढ्यात आढळतात. त्यासाठी चिकन किंवा कारकसची गरज लागते. चिकन ओढ्यात टाकलं की चिकन ला खाण्यासाठी येतात मग त्याच खेकड्या पकडण्याची संधी असते.
नवनाथ हिलम, खेकडे विक्रेता म्हणाले,”
पावसाळ्यात खेकडे खूप मिळतात आणी तशी मागणीही खुप असते. पावसाळ्यात खेड ओढ्यावर, नदीवर  खेकडे पकडून विक्री करून दोन पैसे मिळतात. सहा खेकडांचा एक वाटा असतो. एक वाटा 200 ते 250 रुपयांना विक्री होतो. दररोज 2 ते तीन वाटे मिळतात आणी मिळणाऱ्या पैस्यातुन घर चालते.
*खेकड्यांच्या रस्सा लयच भारी…*
खेकड्यांचे नांगे, पाय तोडायचे. त्यावरील कवटी बाजूला करायची. पेंध्या तोडून त्या साफ करून स्वछ ताटात ठेवायच्या. एका पातेल्यात तेल, मीठ, हळद टाकून साफ केलेले नांगे, पाय व पेंध्या वाफलुन घ्यायचा. एकीकडे पाट्यावर कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर याचं वाटण तयार करायचं. पातेल्यात तेलं टाकून,  मसाले टाकून, वाटण परतून घ्यायचं.आणी त्यात वाफाळलेल्या खेकडे टाकून पाणी टाकायचं. थोड्या वेळाने पाणी आटलं की रस्सा तयारच झाला. गरमागरम खेकड्याच्या रस्स्याबरोबर चुलीवर बनणवलेली बाजरीची भाकरी कुस्कुरून खायची. आणी रस्स्याबरोबर गरमागरम सुवासिक इंद्रायणी भात तर लयच भारी लागतो अशा  वाघमारे म्हणाल्या.

error: Content is protected !!