टाकवे बुद्रुक:
मानव विकास परिषद संस्थेच्या मावळ तालुका उपाध्यक्ष पदी चंद्रकांत वसंत असवले यांची  निवड करण्यात आली आहे.
मानव विकास परिषदचे अफसर शेख संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष, यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली.
राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक चौधरी , राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब लोंढे,व प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर , प्रदेश सचिव डॉ सचिन सूर्यवंशी व असलम सय्यद प्रदेश कार्याध्यक्ष ,अंकुर कदम युवा प्रदेशाध्यक्ष , जयश्री अहिरे महिला प्रदेश अध्यक्ष यांच्या संमतीने अन्सार शेख राष्ट्रीय संपर्कप्रमुख तसेच संस्थेचे खजिनदार अलीम सय्यद यांच्या सहमतीने ही निवड करण्यात आली आहे.
मानव विकास परिषद संस्थेची अनेक वैशिष्ट्ये आहेत.मानव विकास परिषद म्हणजे शोषित, श्रमिक, पोलिस कोठडीत मृत्यु, बेकायदेशीर अटक, शोषण, गुलामगिरी, दहशत, मागसवर्गीयांवर होणारा अन्याय त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयाकडून होणारी पिळवणूक, मानवी हक्कांचे उलंघन, शासकीय अधिकाराचा गैरवापर, भांडवल शाहीकडुन पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेला स्वार्थासाठी होणारा वापर हे सर्व समुळनाश करण्यासाठी तसेच सर्व सामान्यांचे संविधानिक मानवी हक्कांसाठी प्रयत्नशील असलेली ही संस्था
आहे.
मानव विकास परिषद संस्थेच्या अनिता सैद यांनी असवले यांची शिफारस केली होती.सामान्य जनतेला न्याय अधिकार मिळवून देणारा बुलंद आवाज अशी या संस्थेची ओळख आहे. सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ वृत्ती आणि प्रामाणिकपणा यामुळे मानव विकास परिषदला जनतेकडुन प्रचंड समर्थन मिळत आहे या महान कार्यात आपणास सहभागी करण्यास आम्हास अत्यानंद होत असून आपली पुणे मावळ तालुका  उपाध्यक्ष पदावर
नियुक्ती करण्यात येत आहे असे असवले यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
चंद्रकांत असवले हे मावळ तालुक्यात माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहे. तसेच सेवाभावी संस्था असलेल्या सेवा फाऊंडेशन या संस्थेत सक्रीय आहे. दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार अशीही असवले यांची ओळख आहे.   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक येथे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले.
असवले यांच्या निवडीचे मावळ तालुक्यात स्वागत होत आहे. 

error: Content is protected !!