मावळमित्र न्यूज:
महाराष्ट्रातील खव्यांच्या पसंतीस पडलेले, बाराही महिने खव्यांच्या तुडूंब गर्दीने भरलेले मावळ तालुक्यातील शिवराज हाॅटेलची स्पे.बुलेट थाळी .ही थाळी एका माणसाने एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट बक्षिस..! अशी खास ऑफर शिवराजने दिली आहे.
मावळ तालुक्यातील हे एकमेव हाॅटेल आहे,जे आयएसओ नामांकन प्रामाणित आहे.
जिथे खवय्यांसाठी मेजवानी असते,तिथे व्हेज नॉनव्हेज खाल्ल की तृप्तीचे ढेकर येतात. हा तरूण या व्यवसायात येऊ पाहणा-या महाराष्ट्रातील तरुणांसाठी आयडाॅल आहे. वडगाव मावळ येथील अतूल वायकर असे या तरूणाचे नाव,असून हाॅटेल शिवराज हे खाद्यसंस्कृतीतील ब्रॅण्ड झालेले पुणे जिल्ह्यातील मोठे नाव आहे. या हाॅटेल मधील गावरान चिकन,कडकनाथ चिकन,तंदूर,फिशथाळी,व्हेज थाळी,साऊथ इंडियन,चायनीजची चव चाखायला शेकडो ग्राहकांची रीघ लागलेली असते.
येथील पैलवान,सरकार, कडकनाथ बकासूर,मालवणी फिश थाळी, रावणथाळीने महाराष्ट्र भर दबदबा केला आहे,शिवराज मधील गावरान चिकन आणि कडकनाथची चव थेट बाॅलीवूड पर्यत पोहचली. सुपरस्टार नाना पाटेकर यांनी येथील गावरान चिकनच्या रस्सावर ताव मारला. बाॅलीवूड मध्ये पोहोचण्यापूर्वी येथील गावरान मटणाचा ठसका महाराष्ट्रातील कुस्त्याच्या आखाडयात पोहचला.
हाॅटेल शिवराजच्या दोन शाखेतून ग्राहकांना वेगवेगळ्या चिकन,मटण,फिश थाळीचा आस्वाद घेता येईल. पहिली शाखा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत वडगाव मावळ येथे आहे. तर दुसरी शाखा पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कान्हे फाटा येथे राम कृष्ण हरी मंगल कार्यालयाजवळ आहे.

error: Content is protected !!