राऊतवाडी( पवनानगर) :
अनाथ निराधार व गरजु मुलांसाठी  एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत राऊतवाडीच्या कातकरी वस्तीत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. संदिप बबन कल्हाटकर अध्यक्ष हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
गरजु विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप करण्यात आले. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान मावळ अध्यक्ष श्री संदीप बबन कल्हाटकर,क्रिडा आघाडी सचिव बाळासाहेब थरकुडे सर,अध्यक्ष शालिये शि समिती नवनाथ कल्हाटकर,अनंता राऊत,श्याम राऊत,सुनीता राऊत व पालक सर्व उपस्तित होते.
गरीब  व गरजूंनी अधिक माहितीसाठी:९५९४४६४१६२ / ९७६३८७६००७ संपर्क साधावा ,असे आवाहन हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप कल्हाटकर यांनी केले.

error: Content is protected !!