कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
निगडे:
निगडेच्या कुरणवस्ती शाळेची ओळख,झाडांची शाळा अशी होईल असा विश्वास निगडेच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता भांगरे यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरणवस्ती निगडे येथे वसुंधरा पर्यावरण संवर्धन संस्था कडून पन्नास झाडांची भेट देण्यात आली.आणि ग्रामपंचायत निगडे कडून शाळेकरिता पन्नास खड्डे खोदून देण्यात आले व ग्राउंड लेव्हलिंग करून दिले.
  तद्नंतर सरपंच सविता भांगरे,उपसरपंच रामदास चव्हाण, सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ‘उपाध्यक्ष व सर्व सदस्य आणि शाळेचे मुख्याध्यापक जयश्री चांदबोधले , रेखा केकाण  यांच्या हस्ते शाळेमध्ये झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी सरपंच भांगरे बोलत होत्या.
  यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबुशा भांगरे, ज्ञानेश्वर भांगरे, योगेश येवले आणि  ग्रामस्थ उपस्थित होते .वृक्षारोपण यामुळे शाळेचा परिसर सुंदर व सुरख दिसू लागला आहे. याकामी नवलाख उंबरे केंद्राचे केंद्रप्रमुख मिनिनाथ खुरसले  व मावळ तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे साहेब यांचे सहकार्य लाभले .

error: Content is protected !!