पुन्हा एकदा संस्कार प्रतिष्ठान महाराज्यच्या यशात मानाचा तुरा
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठानच्या कोल्हापूर जिल्हा विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्यातील शहरी आणि ग्रामिण भागातून
पुरग्रस्तासांठी केलेली मदत नागरिकांना पुर आला त्यावेळी सलग एक महिना पिण्यासाठी पाणी नव्हते,घराघरात पाण्याच्या बाटल्या जेवण,मेडिकल किट याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.पुर ओसरल्यानंत्तर कोल्हापूर मनपा सोबत नदी स्वच्छता अभियानात भाग घेऊन मदत केली.
कोरोनामध्ये आपण शहर आणि ग्रामिण भागात अगदी जनजागृती पासुन करोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये तसेच घरी जाऊन जेवण ,औषधे दिलीत,जोतिबाचे पुजारी यांना कोरोनामध्ये किटचे वाटप केले..या केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक म्हणुन आज आपल्या संस्थेचा हजारो तरुणांच्या उपस्थितीत सह्याद्री  राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरिय संस्थेच्या वतीने सन्मान झाला आहे .
हा कार्यक्रम रविवार दि.२६/६/२२ रोजी दु.१.वा पन्हाळगड नगरपरिषदेच्या हॉलमध्ये झाला.सन्मानाचे स्वरुप सन्मानपत्र होते हा सन्मान संस्थेचे अध्यक्ष रोहित कदम यांच्या हस्ते दिला. खर तर हा सन्मान आपल्या सभासदांनी अहोरात्र मेहेनत  केलेल्या सेवेचा होता. सोबत पाऊस घनदाट धुके आणि थंडगार वारा यामध्ये आपण सर्वजनांनी सहलीचा आनंद ही घेतला.
प्रत्येक प्रवासात कोणतेही एक देवस्थान होत असते आज रविवार असल्याने आम्ही येतानाच ठरविले होते जोतिबाचे दर्शन घेऊ.
पण प्रत्यक्ष जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराजवळ गेल्यानंतर समोर पाहिले तर तुफान गर्दी,हजारो गाड्या यामधुन जरग सरांनी वाट काढत सर्वांना तेथील पुजारी आदरणिय रविंद्रजी शिंगे यांच्या घरी घेऊन गेले.आम्ही सर्वजण चिंब भिजलेलो होतो.अशा परिस्थितीत  शिंगे परिवाराने गेल्याबरोबर  आदरपुर्वक स्वागत करुन गरमागरम चहा दिला.चहानंत्तर लगेच VIP मार्गाने सर्वांना मंदिरात नेऊन कमी वेळात दर्शन दिले.पुजारी शिंगे यांनी सर्वांना देवाचा प्रसाद म्हणुन श्रीफळ हार पेढे दिलेत.येताना गाडीची पुजा केली हाच सन्मान सर्वात मोठा होता.
कोल्हापूर जिल्हा प्रमुख आदरणिय सचिन जरग सर आणि रेवती जरग मॕडम,आणि पुणे येथून संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड ,संचालिका प्रिया पुजारी,जयवंत सुर्यवंशी,सिने अभिनेत्री रुपाली पाथरे,मिनाक्षी मेरुकर,भागवत मॕडम सुधाकर खुडे,वैशाली खुडे,तरबेज शेख यांनी सन्मान स्विकारला.

error: Content is protected !!