वरसुबाई विद्यालयात वह्यांचे वाटप
माळेगाव खुर्द:
सहयोग उपक्रम संस्थेच्या सेरींग स्माईल या उपक्रमा अंतर्गत वरसुबाई माध्यमिक विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
मानवी जीवनात शिक्षणाला खूप महत्व असून ते विद्यार्थी अवस्थेत प्राप्त केले पाहीजे.आम्ही शिक्षणाचे महत्त्व जाणले शिकलोत म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे.आज शैक्षणिक क्षेत्रात करिअर च्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
आपल्या आवडीचे करीअर निवडून त्या मध्ये बेस्ट बनावे त्या साठी जिद्द,चिकाटी, आणि प्रयत्न करीत रहा यश हमकास मिळेलच असे मत संस्थेचे विठ्ठल बलकवडे यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या वतीने विनोद करांडे,पुष्पराज कुंभारकर,उमेश भोसले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संबधीत देणगीदारांच्या बद्दल ची कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी केले,सूत्र संचलन नामदेव गाभणे यांनी केले तर आभार संतोष बारसकर यांनी माणले.कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र भांड,तुषार पवार व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

error: Content is protected !!