मावळातील कुस्तीपटूंना सरावासाठी मिळणार आधुनिक सुविधा
  वडगांव मावळ :
ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना सरावासाठी आमदार सुनिल शेळके यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत क्रिडा विभागामार्फत मावळातील टाकवे बु. आणि शिरगाव या दोन गावांसाठी सुमारे १७ लाख ८० हजार रुपयांचे कुस्ती मॅट शनिवारी (दि.१८) उपलब्ध करुन दिले आहे.
यावेळी सरपंच भूषण असवले, उपसरपंच परशुराम मालपोटे, माजी उपसरपंच संतू दगडे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, सोमनाथ असवले, विश्वनाथ असवले, सुवर्णा असवले, प्रिया मालपोटे, शिवाजीराव असवले, ऋषीनाथ शिंदे, स्वामी जगताप, नारायण मालपोटे आदि. मान्यवर उपस्थित होते.
मावळच्या मातीतून अनेक कुस्तीचे खेळाडू तयार होत आहेत. ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू घडविण्यासाठी मॅटवर खेळणे ही काळाची गरज बनली आहे. परंतु, बऱ्याच ठिकाणी मॅटची सुविधा उपलब्ध नसल्याचा फटका कुस्तीमध्ये कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूंना बसतो. त्यासाठी ग्रामीण भागात कुस्ती मॅट उपलब्ध करून देण्याचा निर्णय आमदार शेळके यांनी घेऊन मावळातील अनेक गावांना कुस्ती मॅट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या मॅटचा कुस्तीपटूना दैनंदिन सराव करण्यासाठी फायदा होणार आहे.
कुस्ती मॅट उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत प्रतिनिधींसह खेळाडूंकडून आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

error: Content is protected !!