
पिंपरी:
सेवा सहयोग उर्मी प्रकल्पांतर्गत संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि आदर्श महिला बचत गट थेरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श कॉलनी बेलठीकानगर थेरगाव येथे मासिक पाळी व आरोग्य जनजागृती अभियान राबविले.
गौरीताई पेंडसे यांनी महिला व मूलींना मार्गदर्शन केले.पेंडसे यांनी महिला व मुलींना मासिक पाळी संबधित शास्त्रीय माहिती तसेच योग्य आहार, व्यायाम आणि डीस्पोजल साठीच्या रेड डॉट बॅग विषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
महिला व मुलींना रेड डॉट बॅग बनवायला शिकविले आणि ते वापरण्याचे आवाहन देखील केले.
उपस्थित सर्व महिलांना मैत्रिण सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात आले.
संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड आणि आदर्श महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ वैशालीताई खुडे यांनी हे सत्र आयोजीत केले होते. सत्रासाठी त्या भागातील नगरसेविका ममता गायकवाड – माजी स्थायी समिती अध्यक्ष व विद्यमान नगरसेविका (पि. चि. म न पा),मनिषा पवार शिक्षण मंडळ सभापती (पि. चि. म न पा) व
विद्यमान नगरसेविका,करिष्मा बारणे, सामाजिक कार्यकर्त्या, नम्रता भिलारे उपास्थित होत्या. उर्मी करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


