कामशेत :
आषाढी वारी निमित्त श्रीक्षेत्र देहू येथून जगदगुरू श्री.संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने तर श्रीक्षेत्र आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले आहे. पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकरी बांधवांच्या सेवेसाठी समाजातील सर्व घटक सरसावले आहे.
या सेवेत आपलाही खारीचा का होईना वाटा असावा म्हणून, कांबेश्वर महादेव ट्रस्ट संचलित महावीर हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी दिंडी सोहळ्या समवेत आपली सेवा बजावली.
महावीर हॉस्पिटलच्या फिरत्या दवाखान्यात, वारकरी बांधवांना मोफत औषधोपचार करून मसाज करण्यात आली.
डाॅ.प्रमोद गांगुर्डे,डाॅ.लक्ष्मी सिंग,डाॅ.पल्लवी फडतरे,डाॅ.ऐश्वर्या क्षीरसागर,डाॅ.सरोज गांगुर्डे, डाॅ. शिवलिंग डांगे यांच्या पथकाने ही सेवा बजावली.
महावीर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा म्हणाले,” साधुसंतांच्या सेवेचे पुण्य मोठे आहे. हे पुण्य भाग्याने मिळते. महावीर हॉस्पिटलचे पथक दरवर्षी नित्यनेमाने पालखी सोहळ्यात आपली सेवा बजावत आहे. या सेवेचे पुण्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न असतो. परमेश्वर आमच्या कडून ही सेवा करून घेतात.

error: Content is protected !!