शासकीय अधिकऱ्यालाच मारावे लागतात शासन दरबारी हेलपाटे
      टाकवे बुद्रुक :
       येथील तलाठी कार्यालय हे अंदाजे ६० ते ६५ वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. या कार्यालयामध्ये शेतकऱ्याच्या  शेतजमिनीचे अनेक महत्त्वाचे पेपर असून तसेच जुने रेकॉर्ड देखील आहेत.
आजरोजी सदर कार्यलय हे पूर्ण पणे जिर्ण झाले असुन मोडकळीस आलेले आहे, त्याच्या भिंती पोकळ व कमकुवत झाल्या आहेत, व वरील पत्रे सडलेले  अवस्थेत आहेत. सततच्या पावसामुळे व चक्रीवादळामुळे या कार्यालयाचे खुपच नुकसान झाले आहे. येथे काम करणे अडचणीचे होत आहे.
परिणामी हे कार्यालय केव्हाही पडण्याच्या अवस्थेत आहे.  पावसाळ्यापूर्वी सदर कार्यालय नव्याने बांधणे आवश्यक आहे.
तलाठी  गणेश पोतदार म्हणाले,”
ग्रुप ग्रामपंचायत टाकवे  बुद्रुक यांच्याकडे या  कामासंदर्भात मागणी केली असता त्यांनी  तहसीलदार वडगाव मावळ मधुसुदन बर्गे यांच्याकडून  ना हरकत दाखला मागवायला सांगितला, असता सदर दुरुस्ती बांधकाम संदर्भात कोणतीही हरकत नसल्याचे आदेश तहसील कार्यालयाकडून मिळाले. सदर नोटीस ग्रामपंचायत कार्यालयात सादर केले आहे.
परंतु या कालावधीमध्ये पाठपुरावा होत असताना पंचायत समिती उपविभाग सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ व ग्रामपंचायत टाकवे बु. यांच्या कडून कोणतीही हालचाली होत नाही.
ग्रामविकास अधिकारी एस.बी.बांगर म्हणाले,”
तलाठी ऑफिस बांधकामासंदर्भात ग्रामपंचायत  कार्यालयामध्ये  स्थानिक पातळीवरती चर्चा झालेली आहे. यासाठी आज रोजी ठराव मंजूर झालेला नाही तसेच अध्याप कोणती हि  शासकीय मान्यता प्राप्त झालेली नाही.

error: Content is protected !!