
टाकवे बुद्रुक:
येथील न्यू इंग्लिश स्कुल,ज्युनिअर कॉलेज मध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक योगा दिन न्यू इंग्लिश स्कुल मध्ये विद्यार्थी योगा करताना कपाल भारती,अनुमोनिलन,पद्मासन,भूजंगसन, वक्रासन,तारासन, धनुरोशन आश्रसन अशा अनेक प्रकारचे आसनाचे प्रात्यक्षिक साजरे केले.
योगा शिक्षक श्री संतोष जांभुळकर व विश्वकर्मा या योग शिक्षकाने योगाचे प्रशिक्षण घेऊन योगाचे महत्त्व पटवून दिले .
यावेळी योग शिक्षक संतोष जांभुळकर यांनी सरपंच श्री भूषण बंडोबा असवले ग्रामपंचायत टाकवे बु यांच्याकडे योगासाठी जागेची मागणी केली. शाळेत कॉलेजमध्ये मुलांसोबत जुन्या माजी विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक मध्य मुख्याध्यापकांनी ही योगा प्राणायाम केला यावेळी यावेळी योग प्रशिक्षक संतोष जांभूळकर सिद्धी पवळे प्रशांत मोरे व विश्वकर्मा हे होते. पतंजली योग प्रशिक्षण हरिद्वार च्या प्रोटोकॉल नुसार 2022 च्या नुसार लेटेस्ट योग प्राणायाम मोबाईलचा वापर जास्त होत असल्याकारणाने जवळजवळ 80 टक्के लोक मुलांसह मोबाईलचा वापर करतात यामुळे मानेचे व्यायाम मानेचे आजार उद्भवू नयेत यासाठी काही सूक्ष्म व्यायाम मानेचे खांद्यांचे दिले गेले होते तसेच चौथा लाटेमध्ये मानव सतर्क राहावा यासाठी बनवावे यासाठी व्यायाम शिकवले गेले तसेच वापर करावा असे सांगण्यात आले माजी विद्यार्थी हा गावातील प्रथम नागरिक असल्याकारणाने त्याच्याकडे योग प्रशिक्षकांनी भव्य योग भवनाची मागणी केली असता ते आम्ही पूर्ण करू असे आश्वासन दिले
यावेळी मुख्यध्यापक श्री बाळासाहेब उभे सर,असवले सर,जांभूळकर सर,वारींगे सर,कुंभार सर,चव्हाण सर,आल्हाट सर,मदगे सर,जांभुळकर मॅडम,चिनकर मॅडम,ओजरकर मॅडम,बालसराफ मॅडम,खांडभोर मॅडम,उर्मिला मॅडम हे सर्व शिक्षक योगाला उपस्थित होते त्यावेळी प्रास्ताविक श्री नारायण असवले सर यांनी केले. योग प्राणायाम चे फायदे आज जगाने मान्य केलेले आहेत त्यामुळे. योगाने मानवाचा भौतिक सामाजिक शारीरिक आणि आर्थिक अशा सर्वच सर्वांगीण विकास होतो त्यामुळे योग आणि प्राणायाम करणे खूप गरजेचे आहे. कॉलेजचे प्राचार्य श्री उभे सर श्री नारायण आसवले सर सोपान असले सर कुंभार सर जाधव सर सरपंच भूषण अस्वले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ अस्वले हे उपस्थित होते तर तर मुख्य योग प्रशिक्षक संतोष जांभूळकर व शिक्षक सिद्धी पवळे प्रशांत मोरे व विश्वकर्मा यांनी योग प्रात्यक्षिक करून घेतली
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


