जनसेवा विकास समितीच्या वतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
तळेगाव स्टेशन:
जनसेवा विकास समितीच्या वतीने दहावी व बारावी तील उत्तीर्ण  विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिनांक २१ जून रोजी सायंकाळी साडे सहा वाजता हॉटेल ईशा येथे आयोजित करण्यात आला आहे.
दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांना भविष्यातील वाटचालीसाठी करिअर मार्गदर्शन करण्यासाठी करीअर मार्गदर्शक  गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दहावी व बारावीतील विद्यार्थी आपल्या शैक्षणिक करिअर साठी अत्यंत उत्सुक असतात ,त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची योग्य दिशा मिळू शकते. त्यानुसार आपले करिअर घडवणे विद्यार्थ्यांना सोपे जाते त्यामुळेच तळेगाव परिसरातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना करियर गायडन्स करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी केले .
  दहावी बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा हा तळेगाव परिसरातील ईशा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला आहे करियर गायडन्स क्षेत्रातील मान्यवर श्री गणेश जी शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी व पालकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष कल्पेश भगत यांनी केले आहे.
२१ जून रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे .तरी सर्वच विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जन सेवा  विकास समितीचे नगरसेवक निखिल भगत व चिराग खांडगे यांनी केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आल्याचे संयोजकांनी नमूद केले आहे.

error: Content is protected !!