

टाकवे बुद्रुक:
शिक्षकांचा सन्मान, विविध खेळ, गप्पा गोष्टी आणि जुन्या आठवणींना उजाळा देत टाकवे बुद्रुक येथील शाळा जीवन शिक्षण विद्यामंदिर 1994-1995 च्या सातवी पास विद्यार्थी- विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. 27 वर्षानंतर भेटलेल्या वर्ग मित्र मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. सर्व विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनासाठी पुढाकार घेऊन सर्व जन एकत्र आले.
गेट-टुगेदर विदेशा टुरिझम शिंदेवाडी येथे माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या स्नेहसंमेलनाचा शिक्षिका अरुण सोनवणे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवराय, सरस्वती माता व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थिनींपैकी – सामाजिक बांधिलकी ठेऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेले नारायण मालपोटे, हभप. विकास महाराज खांडभोर,उद्योजक शिवाजी शिंदे, संतोष असवले, रूपाली म्हाळसकर, संतोषी खांडभोर, गीता परदेशी,सुलभा आडिवळे, विठ्ठल धनवे, सुरेश चोरघे, दत्ता मालपोटे, संतोष काटकर हिरा धामणकर, रूपाली कालेकर, सीमा मालपोटे, लता तोंडे , योगेश मोढवे , हरिदास कोंडे, विकी बाफना, मनिषा देवकर,राजु जाधव,शैला शिंदे,कांचन गायकवाड, सोमनाथ ग. चोरघे, विष्णु लोंढे, हर्षलता बधाले , हौसा पिंगळे, बाळु गुणाट, सोमनाथ स. चोरघे, बाजीराव कुंभार, हेमंत मोरे, बाळु खरमारे.,साधना निगडे,सादिक अत्तार, बाळू पवळे, अरूण साबळे, अहिल्या मांडेकर, गणेश जांभळे, नवनाथ गायकवाड, सुरेखा भासे , रोहिदास गरुड,सिंधु लोंढे, वैशाली कालेकर, कुंडलिक जाधव
उपस्थित होते. सर्वांनी आप आपले कलागुण सादर करत स्नेह संमेलनाचा आनंद घेतला.
- शिवणे विकास सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी सुनिल ढोरे, रामदास टिळे यांची बिनिरोध निवड
- वाडिवळे रेल्वे गेट क्रमांक ४२ भुयारी मार्ग हटाव कृती समितीच्या वतीने जल समाधी अंदोलन
- गावपातळीवरील विकासाची दूरदृष्टी असलेला सहकारी हरपला: सरपंच नामदेवराव शेलार
- शिवसेनेच्या वतीने तळेगावात निषेध सभेचे आयोजन
- संस्कार प्रतिष्ठानचे रक्षाबंधन भारतीय सैनिकांसोबत





