आंदर मावळ मधील कल्हाट येथील ठाकर वस्तीवरील सहा शेळ्यांचा अचानक मृत्यू .
टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ मधील कल्हाट येथील ठाकर वस्ती मधील बकरी शेळी  पाळ ठाकरांच्या मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. व काही प्रमाणामध्ये बकरी व शेळ्या आजारी झाल्या आहेत.
सदर घटनेची माहिती  कल्हाट येथील पशू प्रेमी दिगंबर आगिवले व  चिंधू आगिवले यांना समजली असता त्यांनी वडगाव मावळ पंचायत समिती येथील वैद्यकीय अधिकारी  यांना  भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली.
येथील वैद्यकीय अधिकारी यांना माहिती समजताच त्यांनी तत्काळ  घटनास्थळी ठाकर वस्ती या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी आजारी असलेल्या शेळ्यांना  प्रथमउपचार केला आहे.
दरम्यान मृत झालेल्या सहा  शेळ्यांचे  शेवविच्छेदन करून औंध येथील विभागीय प्रयोगशाळा  रोगनिदान या ठिकाणी  तपासणीसाठी अहवाल पाठविला आहे.
पोस्टमार्टम साठी वैद्यकीय अधिकारी अजय सुपे व ए. पी. देशपांडे यांनी काम केले.
एकूण सहा शेळ्या मृत्यू
झालेल्या मालकांची नावे  …
••शांताबाई बबन सुप्रे यांच्या दोन  शेळ्या.
••शंकर प्रभाकर सुप्रे  यांची एक शेळी
••बाळू शंकर ठाकर यांच्या तीन शेळ्या  
बाळू शंकर ठाकरे यांनी सांगितले की  “
काल संध्याकाळी  शेळ्या व बकरी रानातून चरून घरी आल्या  नेहमीप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान शेळ्या चरण्यासाठी सोडण्यात आल्या, परंतु काही अंतरावरती चरत  गेल्यानंतर शेळ्या अचानक जाग्यावरती थांबल्यावर त्या स्थितीमध्ये सहा शेळ्या अचानक मृत झाल्या, बाकीच्या पंचवीस शेळ्या व बकरी आजारी अवस्थेत आहेत, आति गंभीर आजारी असणाऱ्या सहा शेळ्यांवरती वडगाव पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार केले आहेत. मृत्यू मुखी पडलेल्या सर्व मादी शेळ्या होत्या.  आजारी असणाऱ्या शेळ्या व बकरी यांची जगण्याची शाश्वती देता येत नाही.
शांताबाई  बबन सुप्रे म्हणाल्या,”
आमच्या ठाकर समाजाचा उदरनिर्वाह पूर्णपणे या शेळ्या व बकऱ्यावरती आहे. या शेळ्या  मृत झाल्यामुळे  उत्पन्नामध्ये घट  होणार आहे, आमच्याकडे नवीन  शेळ्या व बकऱ्या खरेदी करण्यासाठी  आमची पूरस्थिती नाही,  तसेच खूप मोठ्या प्रमाणात आमचे नुकसान झाले आहे शासनाकडून आम्हाला झालेली नुकसान भरपाई मिळावी.

error: Content is protected !!