राजमाता जिजाऊ यांच्या ३४८ व्या स्मृतिदिनानिमित्त टाकवे बुद्रुक मध्ये वृक्षारोपण
टाकवे बुद्रुक:
राजमाता फाउंडेशन यांच्या माध्यमातून व टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतच्या पुढाकाराने व सरपंच भूषण असवले तसेच गावातील ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने भव्य बैलगाडा घाट व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये 300 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने नवनिर्वाचित विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हॉइस चेअरमन संचालक व नवनिर्वाचित सदस्य विश्वनाथ असवले यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान माजी नगरसेविका अध्यक्ष राजमाता फाउंडेशन सुरेखा मारुतराव साळूंखे यांचा सत्कार सरपंच भूषण असवले, उपसरपंच परशुराम मालपोटे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी  राजमाता जिजाऊ फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, सरपंच भूषण असवले, उपसरपंच परशुराम मालपोटे, सोमनाथ असवले, मावळ तालुका वारकरी संप्रदाय अध्यक्ष तुकाराम गायकवाड, माजी उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, माजी अध्यक्ष शिवाजीराव असवले, पोलीस पाटील अतुल असवले, ग्राम विकास अधिकारी सुभाष बांगर, सुवर्णा असवले, प्रतिक्षा जाधव, माजी सरपंच सुप्रिया मालपोटे, संध्या असवले, प्रिया मालपोटे,  उद्योजक संतोष कोंडे, ह. भ. प. संभाजी गुनाट, माजी उपसरपंच सतू दगडे, माजी सरपंच बाळासाहेब कोकाटे, संचालक दत्तात्रेय असवले, माजी चेअरमन विकास असवले, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अनिल असवले, माजी सरपंच स्वामी जगताप, माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आंबेकर, मुख्याध्यापक शिवाजी जरक, शिक्षक नारायण असवले, आचार्य बाळासाहेब उभे,  सेवानिवृत्त शिक्षक रोहन पंडित, उद्योजक अनिल मालपोटे,शेखर मालपोटे. यांसह अनेक नागरिक बहुसंख्येने वृक्षारोपण करण्यासाठी, व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
असंख्य रोपांचे करू रोपण, करण्या वसुंधरेचे रक्षण राजमाता फाउंडेशन यांचे हे  ब्रीदवाक्य आहे.

error: Content is protected !!