


तळेगाव दाभाडे:
ग्रामीण भागात जाणा-या एसटी बस सुस्थितीत व उत्तम प्रकारे सेवा देणा-या असाव्यात अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली.मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव दाभाडे आगार प्रमुखांना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
तळेगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष हर्षद पवार,स्टेशन विभाग अध्यक्ष करण शेळके, ओबीसी सेल युवक अध्यक्ष स्वप्निल मावकर,स्टेशन विभाग विद्यार्थी अध्यक्ष ओंकार जाधव,कामगार सेल अध्यक्ष योगेंद्र शिळीमकर,सोशल मिडीया अध्यक्ष गणेश निळकंठ यांनी आगार प्रमुख यांची भेट घेऊन ग्रामीण भागात जाणा-या एसटी बस बाबतच्या समस्येचा उहापोह केला.
तळेगाव आगारातून आंदर मावळ,नाणे मावळ,पवन मावळात एसटी बसच्या अनेक फे-या होत आहे. एसटी बसने प्रवास करणा-या शाळा,महाविद्यालयीन विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक यांची संख्या मोठी आहे.
तळेगाव खांडी,तळेगाव गोंटेवाडी, ओव्हळे,उकसान,शिवणे मार्गे पवनानगर अशा अनेक बस धावत आहे. परंतू काही बससे जाताना ग्रामीण भागात अचानक पणे बंद पडल्याने नागरिकांना पुढचा प्रवास पायपीट करीत अथवा,मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत घर गाठावे लागत आहे.
शाळा महाविद्यालय सुरू होत आहे.या पार्श्वभूमीवर यापुढे प्रवासी संख्या वाढणार आहे. याचा विचार करून ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक चांगली राहण्यासाठी उत्तम प्रकारच्या बससे ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यात याव्यात ही अपेक्षा, राष्ट्रवादीने व्यक्त केल्या.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




