राज्यसभा निवडणुकीतील  विजय भाजपाचा वतीने पेढे फटाके वाजवून आनंदोत्सव
वडगाव मावळ:
महाराष्ट्रात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे वतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे  आणि  धनंजय महाडिक  यांची  राज्यसभेवर  बहुमताने  निवड झाल्याबद्दल  मावळ तालुक्यात वडगाव शहर भाजपा चे  वतीने पेढे वाटून व फटाके वाजवून  आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
    माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी ही आगामी निवडणुकीची  विजयाची नांदी आहे. हा विजय आमदार लक्ष्मण जगताप व आमदार मुक्ता टिळक  यांना समर्पित आहे असे सांगितले.  जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रविंद्र  भेगडे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांतराम कदम, नगरसेवक प्रविण चव्हाण, विजय जाधव, नारायण ढोरे, सुधाकर ढोरे, सोमनाथ काळे,पंढरीनाथ भिलारे,प्रसाद पिंगळे,भूषण मुथा,प्रमोद म्हाळसकर,किसनराव वाघवले,विठ्ठलराव घारे,नाथाभाऊ घुले, श्रीधर चव्हाण,संतोष म्हाळसकर, नितीन गाडे, वसंतराव भिलारे,प्रज्योत म्हाळसकर,महेंद्र म्हाळसकर, विकी म्हाळसकर व वडगाव शहरातील भाजपा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठया संख्येने उपस्थित होते.
  वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी प्रास्ताविक केले.  युवामोर्चा अध्यक्ष  विनायक भेगडे यांनी  आभार मानले.

error: Content is protected !!