कामशेत:
आयुष्य फार सुंदर आहे,त्याला अधिक सुंदर बनविणे आपल्या हातात आहे. आहार,व्यायाम आणि पुरेशी झोप याकडे लक्ष दिले तर आयुष्याला कितीतरी आनंदी घटना आपसूक घडतात. सकाळी माॅर्निग वाॅक आणि रात्री जेवण झाल्यावर शतपावली हाही सुंदर आयुष्यातील महत्वाचा भाग बनला पाहिजे,असे आवाहन महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी केले.
चालण्याचे अनेक फायदे आहे,चालण्याने ताणतणाव कमी होतो. उत्साह वाढतो,मरगळ दूर होते. चयापचय सुधारते असे एक ना अनेक लाभ आपल्याला चालण्याने होत असल्याचे दिसून येते. चालण्याचे फायदे सांगताना डाॅ.विकेश मुथा म्हणाले,” ताशी ८ किमी किंवा त्याहून अधिक वेगाने चालल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे १० मिनिटांच्या चालण्याचाही शरीराला फायदा होतो. दररोज ३०मिनिटे चालण्याचे शरीराला वेगवेगळे फायदे होतात.
▪︎१०  मिनिटे चालण्याने  साखर नियंत्रित होते.नियमित १० मिनिटांच्या चालण्यामुळे फास्टिंग आणि पोस्ट मील ब्लड ग्लुकोज सुधारते. रात्रीच्या जेवणानंतर ते जास्त फायदेशीर आहे. टाइप २ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज किमान५००० पावले चालणे आवश्यक आहे. यामध्ये ३००० स्टेप्स ब्रिस्क वॉक म्हणजे गाणे गाता न येण्याएवढ्या वेगाने. •२०  मिनिट चालण्याने वृद्धत्व प्रक्रिया मंदावते.
दिवसातून २० मिनिटे वेगवान चालण्यामुळे मायटोकांड्रियाच्या कार्यामध्ये तीव्र सुधारणा होते. मायटोकॉड़िया शरीर आणि विविध अवयवांना ९०% ऊर्जा प्रदान करते. यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. रक्तदाब, कोलेस्टेरॉल व मधुमेह या हृदयाला हानिकारक घटकांत सुधारणा होते.
•30 मि. चालण्याने प्रतिकारशक्ती वाढते शरीराचे संरक्षण करणाऱ्या बी-सेल्स, टी-सेल्स आणि किलर सेल्सची सक्रियता वाढते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. चालताना आकुंचन आणि प्रसरण पावणारे स्नायू पायांमधील
नसांवर दबाव टाकतात, त्यामुळे वेगवेगळ्या अवयवांमध्ये रक्तप्रवाह वाहू लागतो.
•४० मि. चालणे : तणाव कमी होतो
३ मैल प्रतितास या वेगाने ४० मिनिटे चालणे आपल्या शरीरातील तणाव संप्रेरक कार्टिसोलची पातळी कमी करतेच, पण मेलाटोनिनसारख्या स्लीप हार्मोन्सची पातळीदेखील वाढवते. यामुळे चांगली झोप येते. तणाव कमी होतो. याशिवाय स्नायूही मजबूत होतात.
•५० मि. चालणे : वजन वेगाने घटते
४ मैल प्रतितास वेगाने चालल्यास ८० किलो वजनाची एखादी व्यक्ती ५० मिनिटांमध्ये सुमारे ३५०-४०० कॅलरीज बर्न करू शकते. आपण दररोज ५०० कॅलरीज जास्त जाळल्या आणि आहार नियंत्रणात ठेवला तर महिन्याभरात १५ किलोपर्यंत वजन कमी करता येते.
•६० मि. चालणे : सरासरी आयुर्मान वाढते दररोज ६० मिनिटे चालण्याने मेंदू आणि मज्जातंतू दोन्ही शांत होऊन छोटे-छोटे विचार करण्याची क्षमता वाढते. हे व्यक्तीला रणनीतिकदृष्ट्या समृद्ध करते, त्यामुळे सर्जनशीलता वाढते. ६० मिनिटांच्या चालण्याने शरीराच्या जवळजवळ सर्व भागांना फायदा होतो, त्यामुळे सरासरी आयुर्मान वाढते.

error: Content is protected !!