वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाच्या २३व्या वर्धापनदिनानिमित्त वडगाव मावळ येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ध्वजाला  सलामी देऊन ‘राष्ट्रगीत ‘म्हणले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या प्रांगणात झालेल्या वर्धापनदिनास राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे,कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर,ज्येष्ठ नेते सुभाषराव जाधव,नगराध्यक्ष मयूरढोरे,,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके, युवक अध्यक्ष  किशोर सातकर,महिला अध्यक्षा दिपाली गराडे,युवती अध्यक्षा आरती घारे,तळेगाव शहराध्यक्ष गणेश काकडे,वडगाव शहराध्यक्ष प्रविण ढोरे,नगरसेवक सुनिल ढोरे,प्रवक्ते राज खांडभोर,मुख्य संघटक संजय बाविस्कर,वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, सेवादलाचे अध्यक्ष जालिंदर शेटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी  उपस्थित होते.
मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी शुभेच्छापत्र देऊन वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
तालुकाध्यक्ष खांडगे यांनी दिलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटले आहे की,
प्रिय,कार्यकर्ते बंधू भगीनींनो!
सप्रेम नमस्कार!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३व्या वर्धापनदिनानिमित्त आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा. लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपाहून अधिक काळ  पक्षाची यशस्वी वाटचाल अविरत पणे सुरू आहे. पक्षाच्या जडणघडणीत आपला सर्वांचा सिंहाचा वाटा आहे.
राजकारणाला समाजकारणाची जोड देत आपण सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहात. कार्यकर्ता पक्ष संघटनेचा कणा आहे. हे मानून आपण पक्ष संघटनेतील प्रत्येक संघर्षात रस्त्यावर उतरला.पक्षाला मिळालेल्या यशात भंडारा गुलालात रंगला.हलगी तुता-याच्या ठेकावर नाचलात.
पक्षाने आपणांस ही मानसन्मान दिला.पक्ष  स्थापनेनंतरची २३ वर्षे सहज गेली. धर्मनिरपेक्षतेचा विचार आपण तळागाळापर्यंत रूजवला,तोही जोपासला आणि टिकवला देखील.पंचवीस वर्षानंतर मावळच्या मातीत घडयाळाचा गजर झाला. याही ऐतिहासिक विजयाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.बंधू भगिनींनो, येणारा काळ अंत्यत जबाबदारीचा,संयमाचा आहे. तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिल अण्णा शेळके तालुक्याच्या विकासासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहे.
पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी तालुकास्तरावर  आपण विविध उपक्रम राबवत आहोत. गावभेट दौरा,एक तास राष्ट्रवादी साठी,पक्ष मेळावे,बैठकांना आपल्या सर्वाचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एक  कुटूंब आहे. कुटुंबात भांड्याला भांड लागले म्हणून कोणी तक्रार करीत नाही. की,आदळआपट ही करीत नाही. गुण्यागोविंदाने कुटूंब चालते. राष्ट्रवादी हेही आपले कुटुंब आहे.आणि आपण प्रत्येक जण या कुटुंबातील अविभाज्य घटक. त्यामुळे आपल्याला आपले कर्तव्य आणि जबाबदारी याची जाणीव आहे.
आपले कर्तव्य,जबाबदारी अधिक संयमाने पार पाडून राष्ट्रवादी परिवार अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल,असा विश्वास व्यक्त करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो.
कळावे
आपला विश्वासू
गणेश वसंतराव खांडगे
अध्यक्ष,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस.

error: Content is protected !!