
टाकवे बुद्रुक:
अतिदुर्गम भागामधील सावळा येथील गोंटेवाडी ता. मावळ जि. पुणे येथील रामचंद्र कमाजी मुदगन यांना उपअधीक्षक (डेप्युटी सुप्रिटेंड ऑफ पोलीस ) गोरेगाव (मुंबई )SRPF येथे बढती मिळाली.
गोरेगाव येथे शिपाई पदावर 1988 साली नेमणूक झाली होती. शिपाई पदावर नोकरीची सुरुवात केलेले रामचंद्र मुदगन यांनी पोलीस निरीक्षक,नागपूर,अमरावती, दौन्ड ,पुणे अशा ठिकाणी काम केले. आणि आता गोरेगाव (सहा समादेशक ) 2022 पोस्टिंग (DYSP) या पदावर झाली.
याचे अवचित साधून आदिवासी समाज व ट्रायबल फॉरमच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी खांडी गावचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री अनंता पावशे नाणे गावचे सरपंच श्री ज्ञानेश्वर आढारी, ट्रायबल फॉरम पुणे जिल्हा युवक अध्यक्ष श्री विक्रम हेमाडे, आदीवासी समाजाचे युवा नेते रवींद्र काठे टाकवे बेलज गावचे मा. ग्रामपंचायत सदस्य मधुकर कोकाटे सामाजिक कार्यकर्ते सदा शिव ढोंघे, दशरथ आढारी सर अनिल गवारी यशवंत आढारी उपस्थित होते.
या वेळी रामचंद्र मुदगन साहेबांनी आदिवासी समाजातील तरुण मुलांना जास्तीत जास्त MPSC आणि UPSC या कडे लक्ष केंद्रित करावे हा सल्ला दिला. आणि मला जर नोकरीच्या वेळातून वेळ भेटला तर मी समाजातील आणि तरुण मुलाना जास्तीत स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन करेल हे आश्वासन दिले .या वेळी सर्व आदिवासी बांधवानी साहेबांचे कौतुक केले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




