टाकवे बुद्रुक :
ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक येथील वार्ड क्रमांक 1 मधील पोट निवडणूक मध्ये विश्वनाथ असवले निवडून आले.ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक येथील वार्ड क्रमांक 1 मधील  उपसरपंच ऋषीनाथ शिंदे यांनी  काही कारणास्तव मागील तीन  महिन्यापूर्वी त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.
परिणामी एका जागेसाठी 6 उमेदवार रिंगणात उतरले होते. आर्ज माघारीच्या वेळी अखेर 4 उमेदवारांनी माघारी घेतल्यानंतर समोरासमोर सरळ लढत झाली.
दरम्यान  टाकवे बुद्रुक येथे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये विश्वनाथ सुभाष असवले यांना 428 तर प्रतिस्पर्धी साहेबराव टेमगिरे यांना 265 मतदान झाले. तसेच 8 मतदारांनी नोटाला पसंती दिली. एकूण 851 पैकी 701 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी एकूण 82 % मतदान झाले.  विश्वनाथ असवले यांचा 163 मतांनी गवगवित विजय झाला.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून. मंडल अधिकारी सुरेश जगताप व साहाय्यक अधिकारी तलाठी गणेश पोतदार यांनी काम पाहिले. मत मोजणी मध्ये विश्वनाथ सुभाष असवले विजयी झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले .
या विजयाचे खरे शिल्पकार माजी उपसरपंच रोहिदास असवले,नारायण असवले, काळुराम घोजगे हे ठरले आहेत. दरम्यान यावेळी विजयी  उमेदवाराचा सत्कार करताना. माजी उपसरपंच रोहिदास असवले, माजी सरपंच तुकाराम असवले, आदर्श शिक्षक नारायण असवले, माजी चेअरमन अंकुश आंबेकर, बाळासाहेब असवले,संजीव असवले, प्रकाश कोंडे, सुदाम असवले, साहेबराव आंबेकर, बबन कोंडे, माजी चेरमन आनंता असवले, समीर असवले,शंकर असवले, शरद कोंडे, शांताराम असवले, रामनाथ असवले  यांसह आदीजन उपस्थित होते.

error: Content is protected !!