
मावळ तालुका भाजपाच्या वतीने देहूत वृक्षरोपण
देहू:
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तसेच येत्या १४ जूनला श्रीक्षेत्र देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळा होणार आहे.त्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. त्या परिसरात मावळ तालुका भाजप व देहू शहर भाजपाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे ओचित्य साधून वृक्षारोपण केले.
वड, पिंपळ, लिंब या ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे वृक्षरोपण मा राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे व तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, पंचायत समिती चे मा सदस्य बाळासाहेब काळोखे महिला अध्यक्षा सायली बोत्रे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मावळ भाजपा चे मा अध्यक्ष प्रशांत अण्णा ढोरे, मा सभापती गुलाबराव म्हाळसकर,देहूरोड,कॅन्टोमेंट चे मा अध्यक्ष रघुवीर शेलार,महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे विश्वस्त मा श्री जालिंदर महाराज काळोखे, देहू भाजपचे अध्यक्ष मछिंद्र परंडवाल, युवा अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, सचिन काळोखे, राजेश टिळेकर, सुनिल घोडेकर, गणेश खंडागळे,वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे,मा उपसभापती श्रीमती कल्याणीताई ठाकर, वैशाली ढोरे,प्रविण कांबळे, नितीन गाडे,आदीसह तालुक्यातील व देहूमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




