मावळची सुवर्ण कन्या हर्षदा गरूडचा पुन्हा  सुवर्णवेध
वडगाव मावळ:
युवा खेलोइंडिया स्पर्धेत हर्षदा गरूडला सुवर्णपदक मिळाले आहे. भारताची जागतिक सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर वडगांव मावळची हर्षदा गरुड हिने पुन्हा एकदा आपले वेटलिफटिंग मधील वर्चस्व सिध्द केले.. हरियाणा येथे सुरू असलेल्या खेलोइंडिया स्पर्धेत 45 किलो वजनी गटात हर्षदाने स्नॅच प्रकारात 69किलो व जर्क प्रकारात 83किलो असे एकूण 152 किलोग्रॅम वजन उचलून सुवर्णपदक मिळविले .
वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुल ची खेळाडू हर्षदाने मे महिन्यात ग्रिस येथे झालेल्या जागतीक वेटलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून, हे पदक मिळविणारी भारतातील पहिली महिला होण्याचा मान मिळविला होता . सध्या ती पतियाळा येथील इंडिया कॅम्प मधे सराव करत आहे.या कामगिरी मुळे पुढील महिन्यात होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तिची निवड होईल अशी अपेक्षा तिचे गुरू श्री. बिहरीलाल दुबे यांनी व्यक्त केली.
हर्षदा शिकत असलेल्या इंद्रायणी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री . रामदासजी काकडे व कार्यवाह श्री . चंद्रकातजी शेटे तसेच इतर पदाधिकारी व सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे… क्रिडाक्षेत्रात वडगांव मावळ चे खेळाडू नेहमीच उत्तम कामगिरी करत असतात..हर्षदा च्या या कामगिरीने  वडगांव च्या क्रिडा क्षेत्रात अजून एका सुवर्णपदकाची भर पडली या शब्दात वडगांव मावळ नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष श्री.मयूर दादा ढोरे यांनी हर्षदाचे कौतुक केले व तिच्या पुढील कामगिरी साठी तिला शुभेच्छा दिल्या.मावळ तालुक्यातील क्रीडा  क्षेत्र व नागरिकांकडून तिचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!