
मुंबई :ख
सरसेनापती हंबीरराव मोहीते चित्रपट महाराष्ट्र राज्य सरकारने टॅक्स फ्री करावा, अशी मागणी सुभाष तळेकर अध्यक्ष मुंबई डबेवाला असोशिएशन यांनी केली.
जितकी परिस्थिती बिकट तितका मराठा तिखट ! हा सरसेनापती हंबीरराव मोहीते चित्रपटातील डायलॅाग खुपच गाजतो आहे,असा अनुभव तळेकर यांनी सांगितला.
शिवसेनेची सत्ता असलेल्या महाराष्ट्र राज्यात उध्दव ठाकरे सरकारने सरसेनापती हंबीरराव मोहीते हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी “मुंबई डबेवाला असोशिएन “ ने महाराष्ट्र राज्य सरकार कडे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधना नंतर छत्रपती संभाजी महाराज यांना शेवटच्या श्वासा पर्यंत साथ देणारे सरसेनापती हंबीरराव मोहीते यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आली आहे. सरसेनापती हंबीरराव मोहीते यांचा लढा आणि स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे.
स्वराज्याची सेवा, राजांशी निष्ठा, गनिमांचा खात्मा, मृत्यू समोर उभा ठाकला तरी केली जाणारी वचनपूर्तता हे सर्व गुण सरसेनापती हंबीरराव मोहीते यांचे रक्तात अक्षरश: भिनले होते. त्याचे पवित्र रक्तानं महाराष्ट्राची माती पावन झाली आहे. सरसेनापती हंबीरराव मोहीते हे स्वराज्यासाठी लढले हिंदवी स्वराज्याच्या कामी लढतच राहीले प्रसंगी प्राणांचे बलिदान दिले.
सरसेनापती हंबीरराव मोहीते या चित्रपटात त्यांचे शौर्य, त्याग, स्वामीनिष्ठा ठसठशीत पणे दाखवले आहे.
सरसेनापती हंबीरराव मोहीते या चित्रपटाची कथा म्हणजे स्वराज्याचा ईतीहास आहे फक्त स्वराज्याचा ईतीहास नाही तर संपुर्ण महाराष्ट्राचा ईतीहास आहे महाराष्ट्र राज्य सरकारला आमची विनंती आहे की हा चित्रपट टॅक्स फ्रि करावा म्हणजे जास्तीत जास्त प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतील,असेही तळेकर म्हणाले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




