मावळमित्र न्यूज विशेष:
गडकिल्ल्यांवर भटकंती करणारा..छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या विचाराला स्मरून…गडकिल्ले संवर्धन आणि गडकिल्ल्यांवर स्वच्छतेसाठी राबणारा..तरूण गोरगरीब जनतेत जावून तितकाच मिळून मिसळून काम करीत आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या समाधीला दरवर्षी न चुकता आभिवादन करणा-या गाव खेड्यातली या तरूणाने मैत्रीला ऐश्वर्य आणि संपत्ती मानले आहे.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या गडकिल्ल्यांवर स्वच्छतेच्या कामात अग्रेसर असणा-या तरूणाने या कामातून महाराष्ट्र भर जीवा भावाचे मित्र जमावले आहे.आर्थिक श्रीमंती पेक्षा मैत्रीची श्रीमंती कैकयी पटीने अधिक असल्याचे साधे गणित उमगलेल्या तरूणा भोवती कायमच मित्रांचा गराडा असतो. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान ही ओळख जपणारा प्रतिष्ठानचा अध्यक्ष,संदीप बबनराव कल्हाटकर असे या तरूणाचे नाव आहे..


संदीप भाऊ यांचे  कल्हाटच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण आणि  भोयरे तील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण झाले. घरची परिस्थिती बेताचीच होती.दोन मुले व एका मुलीला आई वडीलांनी शिक्षणाची संस्काराची जोड दिली.
पोटा पाण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईत जावून डबेवाला अशीही स्वतःची ओळख निर्माण केली.टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय केला.काही वर्षी बांधकाम व्यवसायात नोकरी केली. मुंबईच्या झगमगाटात मन रमेना म्हणून,परत मावळ  गाठले.स्वस्थ घरात बसून राहील तो,मावळा कसला. संदीप कल्हाटकर ही अस्सल मावळा. तोही कसा शांत बसेन त्यानेही हाताला मिळेल ते काम केले. कामातून अनुभव मिळाला. शुद्धतेचा विचार करीत घरोघरी शुद्ध पाणी मिळावे यासाठी  हिंदवी स्वराज्य इंटरप्रायजेस चा व्यवसाय सुरू केला. त्यातून
घरोघरी शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ते आग्रहाने वाॅटर फिल्टर विकत आहे.
  संदीपचे आई वडीलांवर मोठे प्रेम. २०१६ ला आई भीमाबाई जाणं आयुष्यातली सर्वात मोठे दु:ख .आईच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी गरीब गरजू विद्यार्थांना वह्या,पुस्तके,दप्तर,गणवेश वाटपाचे काम सूरू आहे. आता पर्यत अनेक गरजू मुलांना मदत देऊन शिक्षणाचा प्रवाह टिकवून ठेवण्याचे काम केले.

अध्यक्ष,हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान,पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून ते काम करीत आहे. या दोन्ही संस्था समाजाभिमुख काम करीत आहेत. गोर गरीब,गरजू ,अनाथांना सदैव मदतीचा हात पुढे केला जात आहे. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान ही ओळख बनली आहे. ही ओळख जपण्यासाठी जीवाचे रान करीत सामाजिक कार्यात झोकून देणारा हा तरूण राजकीय व्यासपीठापासून दूर आहे.
सातत्याने सकारात्मक विचारांवर काम करणा-या या तरूण मित्राने पस्तीशी ओलांडली आहे. जीवनाच्या महत्वाच्या टप्प्यावर आलेल्या, मित्राला आई तुळजाभवानीने  सुयश देऊन,सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जपण्याची ताकद देवो,ही आई भवानी मातेच्या चरणी प्रार्थना.
आज संदीप,यांचा वाढदिवस आहे,आजच्या दिनी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.देताना संदीप यास,यश,किर्ती,ऐश्वर्य लाभो या आदरपूर्वक शुभेच्छा..

error: Content is protected !!