
कामशेत:
नदीपात्रात पडलेल्या लेकाला वाचवताना आई आणि मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची अंत्यत दुर्देवी घटना कामशेत शहरात घडली.मायलेकांना साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला.आई आणि लेकाच्या मृत्यूने मावळ तालुका हळहळला.
शनिवार दिनांक ४.६.२०२२रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास आई आणि लेक पाण्यात बुडले. त्यांना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल केले. परंतू त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,”मौजे नायगाव गावचे हद्दीत इंद्रायणी नदी पत्रात येथे आई पुनम दिनेश शिंदे वय ३८ व मुलगा युवराज दिनेश शिंदे वय १४ दोन्ही राहणार कामशेत ता, मावळ जि, पुणे हे नदीपात्रात गोधड्या धुण्यासाठी गेले असता मुलगा युवराज हा पाण्यात पडला.
त्यास वाचविण्यासाठी त्याची आई पुनम हिने पाण्यात उडी मारली ,ते दोघे ही पाण्यात बुडूलागल्याने त्यांना वाचवण्यासाठी पुनमचा भाऊ अक्षय टाकवे व दाजी विजय लालगुडे यांनी त्यांना पाण्या बाहेर काढले. उपचार कामी महावीर हॉस्पिटल कामशेत येथे आणले ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अब्दुल शेख हे पुढील तपास करीत आहेत.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




