वडगाव मावळ मधील रस्त्याच्या कामात दिरंगाई
वडगाव मावळ:
मावळ  तालुक्याचे मुख्यालय म्हणून ओळख असणाऱ्या वडगाव मावळ येथे केंद्रशासनाचा  सुमारे चार कोटी रूपये निधी रस्त्याच्या कामासाठी उपलब्ध, मंजूर झालेला असून  पाच महिन्यापासून रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. कामात दिरंगाई व प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामधून स्पष्ट दिसत आहे. सत्ताधारी  या कामा संदर्भात फक्त बघ्याची   भूमिका घेत असल्याचा घणाघात वडगाव शहर भाजपाने केला आहे.
सार्वजनिक बांधकाम   यांना वडगाव मधील रस्त्याचे काम  संथ गतीने चालू असल्या संदर्भात  भारतीय जनता पार्टी वडगाव शहराचे  वतीने सदर काम जलद गतीने सुरु होण्यासाठी  निवेदन दिले आले.वडगाव शहरामध्ये, हॉस्पिटल, शाळा, कामगार वर्ग तसेच जिल्हा सत्र न्यायालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, रजिस्टर ऑफिस इत्यादी सह अनेक सरकारी कार्यालय या ठिकाणी असल्याने , सर्वांची वरदळ याच रस्त्याने होत असते.
विद्यार्थी, कामगार वर्ग, आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकांला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, या संपूर्ण प्रकरणाची व गैरसोयीची गंभीर दखल घेऊन  सदर काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अन्यथा भाजपा वडगाव शहराचे वतीने  सदर कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
वडगाव शहर भाजपचे  अध्यक्ष अनंता कुडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगरसेवक भूषण मुथा,सरचिटणीस  कल्पेश भोंडवे, मकरंद बवरे,दिलीप म्हाळसकर ,युवक अध्यक्ष विनायक भेगडे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष दीपक भालेराव उपस्थित होते.

error: Content is protected !!